dr.satish best web design developer for mac

बसर्गे ग्रामपंचायत :

बसर्गे बुद्रुक हे सामानगडापासून अगदी आठ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामधील एक गावं. या गावची 4,293 लोकांची वस्ती असून हे गाव तसं मोठंच आहे. तसेच गावात 5 जुलै 1952 रोजी प्रथम ग्रामपंचायत अस्तित्वात आली असून गावात ग्रामपंचायतीने लोकांच्या हितासाठी शासनाच्या खूप योजना राबविल्या आहेत. तसेच गावची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी गावामध्ये  स्वच्छता अभियान चालू केले असून, गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

बसर्गे बुद्रुक ग्रामपंचायत ही 1952 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 1,105 असून गावाची लोकसंख्या 4,293 इतकी आहे.एकूण घरांची संख्या 1,375 असून ती 4 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.

सरपंच


गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. सुरेश आणाप्पा माणेकरी

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. शशिकांत भैरू कुंभार

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Basarge (Budruk) Grampanchayat
A/p Basarge (Budruk) Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :9420131118

Office : 02327 – 265143